कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचे सोपे टिप्स

गुरूवार, 20 मे 2021 (08:45 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. 2021 साली कोरोनाच्या लाटेने सर्वांनाच धक्का बसून सर्वत्र हाहाकार माजला आहे.  सन 2020 पासून आलेल्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वैज्ञानिक आणि डॉक्टर यांनी सतत हात धुणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. चला जाणून घेऊया सल्लागार हात धुण्यावर इतका भर का देत आहेत?
 
व्हायरस कसा तयार होतो? हात का धुतले जातात?
बहुतेक व्हायरस तीन गोष्टींनी बनलेले असतात - आरएनए, प्रथिने आणि लिपिड. या तीन थरांमध्ये अनुक्रमे व्हायरस तयार होतात. लिपिड थराने बाहेरून व्हायरस ला व्यापले जाते. परंतु ही थर सर्वात जास्त कमकुवत आणि असुरक्षित आहे. आता बाह्य थर कमकुवत असल्यामुळे ती  सहज तुटू शकते. विषाणूचा हा थर तोडण्यासाठी कोणत्याही धारदार रसायनाची आवश्यकता नाही. म्हणून, साबणाने हात धुऊन ही थर सहजपणे तोडली जाऊ शकते.
व्हायरस 50-20,000 नॅनोमीटर दरम्यान असतं. आणि व्हायरस देखील नॅनो कणांसारखा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते, खोकते   तेव्हा त्याच्या नाकातून आणि तोंडातून बाहेर येणारे कण खूप धोकादायक असतात.नाकातून आणि तोंडातून येणारे पाणी कोरडे होते परंतु हे बॅक्टेरिया नष्ट होत नाही. कपड्यांवर आणि आणि त्वचेवर सर्वात अधिक बॅक्टेरिया असतात. आणि ते दीर्घकाळ असतात. म्हणून शक्यतो शिंकताना आणि खोकताना नाकावर आणि तोंडावर हात ठेवूनच शिंकावे. नंतर लगेचच हात धुवावे.
 
हात धुताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
तज्ज्ञांच्या मते, हात धुतल्याने विषाणूंव्यतिरिक्त अतिसार, कावीळ, टायफॉइड सारख्या गंभीर आजारांनाही टाळता येऊ शकतं. सर्वसामान्य लोकांनी वापरलेल्या रुमालाने कधीही हात पुसू नये याची काळजी घ्या. एकतर ते हवेत कोरडे करा किंवा आपल्या वैयक्तिक रुमालने आपले हात पुसावे. वास्तविक ओले टॉवेल्स, नॅपकिन्समध्ये  बॅक्टेरिया उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
शास्त्रज्ञांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेने असे सुचवले आहे की जेव्हा आपण आपले हात धुवाल तेव्हा आरामात धुवा. सर्व प्रथम साबण घ्या, थोडंसं  पाणी घाला आणि किमान 30 सेकंदांपर्यंत हातांना आरामात धुवा.असं केल्याने आपण आजारापासून वाचू शकता.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती