सॅलड खाताना या चुका टाळा नाहीतर होऊ शकते फूड प्वाइजनिंग

शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (09:07 IST)
सॅलड खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे तरी अनेक लोकांना हे सेवन करण्याची योग्य पद्धत माहित नसते. यामुळे पौष्टिक खाऊन देखील आरोग्यावर विपरित परिणाम ‍दिसून येतात. याने नुकसान देखील झेलावं लागतं. विशेष करुन पावसाळ्यात सॅलड खाणे टाळावे. नाहीतर फूड प्वाइजनिंग सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
 
सॅलड खाण्याची योग्य वेळ
डाइटीशियनप्रमाणे जेवण्यासोबत सॅलड खाऊ नये. याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो. डाइटीशियन जेवण्यापूर्वी सॅलड खाण्याचा सल्ला देतात. आपण जेवण्याच्या अर्ध्या तासापूर्वी सॅलड खाऊ शकता. यामागील कारण म्हणजे याने आपली भूक कमी होते. तसेच आपण जेवण्यात कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी घेता म्हणून वजनावर नियंत्रण राहतं.
 
याने शरीराला अनेक प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळतात. या व्यतिरिक्त सॅलडमध्ये मीठ न घालता सेवन करणे अधिकच उत्तम ठरतं. असे करणे शक्य नसल्यास आपण काळं मीठ वापरु शकता. 
 
काकडी रात्री खाऊ नये. तसेच सॅलड लगेच तयार करुन सेवन करावं. खूप आधीपासून कापलेलं सॅलड खाऊ नये. यात बॅक्टिेरियाची वाढ लवकर होते म्हणून सॅलड उघडे देखील ठेवू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती