Pressure Cooker Side Effects : कुकरमध्ये जेवण बनवण्याने होऊ शकतात हे चार नुकसान
* कुकरमध्ये जेवण बनवल्याने बद्धकोष्ठता आणि पचन संबंधी समस्या होऊ शकतात.
* कुकरमध्ये जेवण बनवल्याने जेवणातील पोषकतत्वे नष्ट होतात.
* कुकरमध्ये स्टार्च युक्त पदार्थ व्यवस्थित शिजत नाही. या मुळे वजन वाढू शकते.
* कुकरमध्ये भात शिजवल्याने त्यात कार्ब्स आणि स्टार्च यांची मात्रा अधिक प्रमाणात होते.
भारतातील प्रत्येक घरात प्रत्येक दिवशी कुकरची शिट्टी वाजतांना दिसते. प्रेशर कुकरमध्ये वरण भात सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात तसेच वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. सोबतच प्रेशर कुकरमध्ये केक पण बनवतात पण तुम्हाला माहित आहे का, की प्रेशरकुकर मध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. प्रेशर कुकर तुमच्या पचन तंत्राला आणि शरीराच्या अन्य अवयवांना प्रभावित करतो. कुकर मध्ये जेवण बनवणे खूप सोपे असते आणि ते खूप कमी वेळात पण बनते. म्हणून लोक प्रेशर कुकरचा जास्त प्रमाणात उपयोग करतांना दिसतात.