मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी आवश्यक पोषक घटक

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (15:07 IST)
मासे केवळ सर्व वयोगटातील लोकांना संतुलित आहार पुरवत नाही तर तीक्ष्ण मन, तीक्ष्ण दृष्टी आणि हृदयरोग यासारख्या घातक रोगांच्या प्रतिबंधत करण्यात मदत करतं. ओमेगा 3 आणि दर्जेदार प्रथिने अनेक प्रकारच्या माशांमध्ये आढळतात, जे तीक्ष्ण मेंदू, दृष्टीदोष आणि हृदयरोग यासारख्या धोकादायक रोगांच्या प्रतिबंधात मदत करतात. 
 
असे म्हणतात की मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी आहेत. मासे खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्वच पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात मिळतात.
 
मासे पोषक स्वरुपात खाल्ले तर हृदय आणि मेंदू तंदुरुस्त राहते.
माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.
माशांमध्ये असलेले ऑईल त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन E असते. 
माशांमध्ये असलेले फॅटी अॅसिड तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला देण्यास मदत करते. 
मासेचे सेवन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
माशांमुळे तुमचा अस्थमा कमी होण्यास मदत होते.
निद्रानाशाचा त्रास असेल तर मासे खाणे योग्य ठरेल. माशांमध्ये असलेले ओमेगा झोप सुधारण्यास मदत करते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती