तोंडाची दुर्गंधी ही एक अशी समस्या आहे जी एखाद्यासमोर लाजिरवाणी वाटते. बाजारात उपलब्ध असलेले टूथपेस्ट आणि पेस्ट काही काळासाठीच आराम देतात पण काही वेळांनंतर समस्या तशीच राहते. या वर घरगुती उपाय केल्याने फायदा मिळतो. या साठी कडुलिंबाची पेस्ट वापरा.
कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात जे केवळ दुर्गंधी दूर करत नाहीत तर हिरड्या आणि दातांनाही मजबूत करतात. तसेच याचे वैशिष्टये म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
कडुलिंबाची पेस्ट कशी बनवाल
यासाठी, सर्वप्रथम 1 कप ताजी कडुलिंबाची पाने घ्या, ती पूर्णपणे धुवा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. बारीक करताना, पेस्ट तयार करण्यासाठी थोडे पाणी घाला. पेस्ट तयार झाल्यावर त्यात अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल घाला.
सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळल्यानंतर, हे हर्बल टूथपेस्ट तयार होईल. ते एका काचेच्या डब्यात भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. हे सहजपणे 5-6 दिवस टिकेल.
ही हर्बल टूथपेस्ट दररोज सकाळी आणि रात्री वापरली जाऊ शकते. तुमच्या बोटाने किंवा ब्रशने 2-3 मिनिटे हलक्या हाताने दात घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. याच्या नियमित वापरामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबूत होतात. याशिवाय, ते दातांचा पिवळापणा कमी करते आणि पोकळी निर्माण होण्यास प्रतिबंध करते.
फायदे
तोंडाच्या दुर्गंधीवर ही पेस्ट फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये तर कडुलिंबाची ही हर्बल पेस्ट खूप फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे तोंडात दुर्गंधी पसरवण्याऱ्या बॅक्टरीयाला नष्ट करतात.
हिरड्यांना सूज येत असेल, रक्तस्त्राव होत असेल किंवा हलका वेदना होत असल्यास या पेस्टचा नियमित वापर केल्याने हिरड्या निरोगी होऊन मजबूत होतात.
दात पिवळे दिसत असतील आणि तुम्हाला ते उजळवायचे असतील तर कडुलिंबाची हर्बल टूथपेस्ट हा एक प्रभावी उपाय आहे. काही दिवस सतत वापरल्याने तुमच्या दातांचा पिवळापणा कमी होईल आणि त्यांची नैसर्गिक चमक परत येईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.