हिवाळ्यात काय खावं आणि काय टाळावं जाणून घेऊया

सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (12:16 IST)
हिवाळा हा ऋतू आरोग्याचा आहे. असं म्हणलं जातं. पण आरोग्य वर्धनाच्या नावाखाली अनेकदा अरबट-चरबट खाणं होतं. त्याचा परिणाम साहजिकच आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. वजन जास्त म्हणजे उत्तम आरोग्य असा एक गैरसमज सर्वत्र रुढ आहे. त्यामुळे या दिवसात वजन वाढवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील दिसतात. पण उत्तम आरोग्यासाठी डाएट उत्तम असणं गरजेचं आहे. हिवाळ्यात पालेभाज्या खाणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम समजलं जातं. हिवाळ्यात काय खावं आणि काय टाळावं जाणून घेऊया याविषयी...
 
* दुग्धजन्य पदार्थ- दूध हे पूर्णान्न समजलं जातं. पण असं असलं तरी हिवाळ्यात याचा वापर कमी करावा. कफ होण्याचं दूध हे मुख्य कारण असतं. त्यामुळे कफाचा त्रास असणार्यांनी दूध टाळणंचयोग्य.
* साखर- थंडीमध्ये गरमागरम चहा किंवा उष्णता देणारी इतर पेयं प्यायला, प्रत्येकालाच आवडत असतं. पण या पेयांमध्ये असलेली साखर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी करू शकते. त्यामुळे साखरेचा अतिरिक्त वापर थंडीमध्ये टाळाच.
* लाल मांस- थंडीचे दिवस मांस खाण्यासाठी उत्तम असतात. असं समजत असाल तर थोडं थांबा. लाल मांस उष्णता वाढवतं हे खरं असलं तरी शरीरातील कफाचं प्रमाणही त्यासोबत वाढलं जातं. त्याला पर्याय म्हणून प्रक्रिया केलेल्या मांसाऐवजी ऑर्गेनिक मांसाचा वापर खाण्यात करावा.
* बिगर मोसमी फळं- या ऋतूमध्ये अत्यंत चांगली फळं बाजारात आलेली असतात. पण या फळांसोबतच बिगर मोसमी फळंही दिसतात. पण ही फळं या दिवसांमध्ये अनारोग्याचं कारण बनू शकतात. 
* या थंडीत गरम चहा किंवा कॉफी, हॉट चॉकलेट प्यायचा मोह सर्वांना होत असतो. पण हे पदार्थ तुमच्या शरीराला डिहायड्रेड करू शकतात. या पेयांऐवजी तुम्ही हर्बल पेय पिऊ शकता. हर्बल पेयांमुळे तुमचा उत्साह टिकून राहण्यास मदत होईल.
स्वाती पेशवे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती