बर्याच जणांना सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पहाटे उठायचं, आवरायचं आणि जीममध्ये जायचं हे रूटिन अनेकांना नकोसं वाटतं. पण पर्याय नसल्याने बरेचजण सकाळी उठून जीममध्ये जातात. मात्र सकाळचा व्यायाम जास्त प्रभावी असल्याचं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. रात्रीची सात ते आठ तासांची झोप मिळाल्याने शरीर ताजंतवानं झालेलं असतं. त्यामुळे व्यायामाचे सर्वाधिक लाभ मिळवायचे असतील तर सकाळी उठायला सुरूवात करा.
* वेळेत उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. सकाळी कोणी उठवणारं नसेल तर फोनमध्ये अलार्म लावून घ्या. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने चार ते पाच अलार्म लावा. यामुळे वैतागून का होईना, तुम्हाला उठावं लागेल.