कांद्याचे 5फायदे जाणून घ्या

शुक्रवार, 7 मे 2021 (21:28 IST)
जेवणात सलॅड म्हणून कांदा घेतला जातो. चविष्ट असल्यासह आरोग्याच्या दृष्टीने कांदा खूप फायदेशीर आहे  त्वचेवर कांदा चोळल्याने देखील या पासून फायदे मिळतात. चला तर मग याचे फायदे जाणून घेउ या. 
 
1 उन्हाळ्यात कांद्याचा वापर खाण्यासाठीच नव्हे तर त्वचेवर चोळण्यासाठी देखील केला जातो. या मुळे उष्णता कमी होते आणि शरीराचे तापमान संतुलित राहते. 
 
2 तळपायात होणारी जळजळ कमी करण्यासाठी  देखील किसलेला कांदा चोळल्याने फायदा होतो. हे उष्णतेपासून बचाव करते.
 
3 त्वचेचे संसर्गाचा नायनाट करण्यासाठी देखील कांद्याचे रस किंवा किसलेला कांदा चोळावा. या मुळे त्वचेचे संसर्ग नाहीसे होतात. 
 
4 डास चावल्यावर होणाऱ्या पुळ्यांना तसेच त्वचा लालसर होते त्यावर चिरलेला कांदा लावल्याने सूज,लालसरपणा कमी होतो. 
 
5 डोक्याच्या त्वचेवर कांदा चोळल्याने गळलेले केस पुन्हा येतात आणि केसात उवा झाल्या असल्यास उवांचा नायनाट होतो.   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती