दुधात तुळशी घालून पिण्याचे फायदे जाणून घ्या.

शुक्रवार, 7 मे 2021 (18:40 IST)
दूध पोषणाच्या  दृष्टीने अमृततुल्य आहे आणि तुळशी ही औषध म्हणून वापरली जाते. हे आपल्या प्रतिकारक क्षमतेला वाढविण्याचे काम करते. या दोन्हीचे मिश्रण करून घेतल्याने आरोग्याशी निगडित फायदे होतात. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊ  या.  
 
* दमाच्या रुग्णांसाठी हे उपाय फायदेशीर आहे. हंगामाच्या बदलमुळे होणारे आजार आणि श्वास संबंधी होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी दूध आणि तुळशीचे हे मिश्रण फायदेशीर आहे.  
 
* डोके दुखी किंवा मायग्रेन असल्यावर हे आपल्याला त्वरितच आराम देईल. मायग्रेनचा त्रास असल्यास आपण हे पिऊ शकता, दररोज याचा सेवन केल्याने आपला त्रास कमी होऊ शकतो. 
 
* आपल्याला तणाव असल्यास दुधात तुळशीचे पत्ते घालून उकळवून प्यावे, या मुळे आपले तणाव दूर होईल. तणावाची समस्या नाहीशी होईल.
 
* हृदयाच्या त्रासांमध्ये देखील फायदेशीर आहे. सकाळी अनोश्यापोटी हे दूध प्यावे  या मुळे हृदयाशी संबंधित आजारात फायदा मिळू शकतो. हे किडनीत होणाऱ्या खड्यासाठी देखील फायदेशीर आहे.
 
* तुळशीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात, याचा सेवन आपल्याला कर्करोगापासून वाचवू शकतो.या शिवाय सर्दी मुळे होणाऱ्या त्रासांसाठी देखील हे चांगले उपाय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती