दैनंदिन जीवनात दही सेवन करण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या

शनिवार, 8 जून 2024 (07:50 IST)
दही आपल्या भारतीय जेवणातील एक महत्वपूर्ण पदार्थ आहे. दही फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का दही खाण्याची योग्य वेळ कोणती? तर चला जाणून घेऊ या दही केव्हा आणि कसे खावे. 
 
सकाळची वेळ-
सकाळच्या वेळी दही खाणे खूप चांगले असते. हे पाचन तंत्र सुरळीत ठेवते. व दिवसभर आपल्यलाला ताजे ठेवते. सकाळी नाश्त्यामध्ये दही खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि हे दिवसाच्या सुरवातीसाठी एक चांगला पर्याय आहे. 
 
दुपारची वेळ-
दुपारच्या जेवणासोबत दही खाणे देखील फायदेशीर असते. यामुळे पाचनतंत्र सुरळीत राहते. उन्हाळ्यामध्ये दही दुअप्री दही खाल्यास शरीराला थंडावा मिळतो. 
 
संध्याकाळची वेळ-
संध्याकाळी देखील आपण दही सेवन करू शकतो. खास करून तुम्ही फळांसोबत खाऊ शकतात. 
 
रात्रीची वेळ- 
रात्री कधीही दही खाऊ नये. खास करून जर तुम्हाला सर्दी-खोकला समस्या असेल तर खाऊ नये. पण जर तुमचे शरीर दह्याला पचवण्यामध्ये सक्षम असेल  तर तुम्ही रात्री दही खाऊ शकतात. पण कमी प्रमाणात सेवन करावे. 
 
फ्रीजमधून काढून लागलीच दही खाऊ नये. दही हा एक पौष्टिक आणि आरोग्यवर्धक पदार्थ आहे. दही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच फायदे मिळतील. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती