Swelling on feet काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्यांचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात.
अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.
२) रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
३) अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.
४) उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.