मुलं प्लान करण्यापूर्वी सर्वात आधी डॉक्टरचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी. याने आपलं शरीर गर्भधारणेसाठी तयार असल्याचे माहीत पडेल.
Ovulation ची वेळ
गर्भधारणेसाठी अंडं ओव्हरीतून बाहेर पडल्याच्या 24 तासात फर्टिलाइज झाले पाहिजे. पुरुषाचे स्पर्म्स स्त्रीच्या प्रजनन पथात 48 ते 72 तासापर्यंत जिवंत राहू शकतात. तसेच मुलं पैदा करण्यासाठी आवश्यक भ्रूण आणि स्पर्मचं मिलन होणे आवश्यक आहे म्हणून Ovulation ची वेळ असताना 72 तासात एकदा तरी संबंध स्थापित केले पाहिजे. तसेच पुरुषांचे 48 तासात एकाहून अधिक वेळा इंजेक्शन होता कामा नये नाहीतर स्पर्म्स काउंट कमी होऊ शकतं.
Ovulation ची वेळ जाणून घेण्यासाठी मासिक धर्म चक्राबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. हे 24 ते 40 दिवसात होऊ शकतं. तसेच पुढील पाळी कधी येणार याबद्दल अंदाज असल्यास त्याच्या 12 ते 16 दिवसांपूर्वीची वेळ आपल्यासाठी योग्य ठरेल. उदाहरणार्थ जर पीरियड्सची सुरुवात 30 तारखेला होणार असेल तर 14 ते 18 तारीख या दरम्यानची वेळ Ovulation ची वेळ असेल. या व्यतिरिक्त योनीतून निघणारे तरल पदार्थ आपल्या बोटावर घेऊन त्याची लवचीकता तपासून बघा. अधिक लवचीक असल्यास संबंधासाठी योग्य वेल असल्याचे समजा.
लाइफस्टाइल
गर्भधारणा करण्यासाठी नवरा-बायकोची जीवनशैली व्यवस्थित असणे गरजेचं आहे. व्हिटॅमिन्सच योग्य प्रमाण घेतल्याने फर्टिलिटीची शक्यता वाढते आणि योग्य आहार व दररोज व्यायाम केल्याने देखील फायदा होतो. व्यसन करणार्या स्त्रियांचे गर्भधारणा करण्याची संधी 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊन जाते.
ताणमुक्त
अधिक ताण असल्यामुळे गर्भधारणा करण्यात समस्या उद्भवतात. अधिक ताण असल्यास मासिक पाळीवर देखील प्रभाव पडतो. शांत मन शरीरावर चांगला प्रभाव टाकत असून गर्भधारणेची शक्यता वाढून जाते. यासाठी दररोज श्वासासंबंधी व्यायाम आणि मेडिटेशन करणे योग्य ठरेल.
अंडकोषाची काळजी
स्पर्म्स अधिक तापमानात मृत होऊ शकतात म्हणून अंडकोष जिथे स्पर्म्स निर्मित होतात त्या जागेचं तापमान सामान्य असावा. अर्थात त्या जागेवर घट्ट बेल्ट बांधणे, किंवा अधिक गरम पाण्याने अंग धुणे, किंवा अधिक गरम स्थान असलेल्या जागी खूप वेळ काम करणे टाळावे किंवा काळजी घ्यावी.
आराम
संबंध स्थापित केल्यावर किमान 15 मिनिट आरामात पडून राहावं. याने महिलेच्या योनीतून स्पर्म निघण्याची शक्यता कमी होऊन जाते.
व्यसन टाळा
कोणत्याही प्रकाराचा नशा केल्याने हॉर्मोसचं संतुलन बिघडतं आणि प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम पडू शकतो.
औषधं
अनेक औषधं फर्टिलिटीवर वाईट प्रभाव सोडतात. अनेक ड्रग्स ओव्यूलेशन थांबवू शकतात म्हणून अधिक औषधांच प्रयोग टाळावा. कोणतेही औषध घेण्याच्या किंवा सोडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. स्वत:च्या मनाने उपचार घेणे नुकसानदायक ठरू शकतं.
कृत्रिम वंगण टाळा
जेल, तरल पदार्थ इतर पदार्थ स्पर्म्सच्या प्रवासात अडथळे निर्माण करतात. असे काही उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. तसेही आर्टिफिशिल ल्युब्रिकेंटची गरज नसते कारण ऑर्गेज्म दरम्यान शरीर पुरेश्या प्रमाणात द्रव निर्मित करतं जे स्पर्म्स आणि ओव्हरी दोन्हीसाठी आरोग्यदायक असतं.
नोट: कोणत्याही उपायावर अमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर आणि योग्य ठरेल.