हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि काय नाही

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (07:17 IST)
अतिआम्लतेला हायपरएसिडीटी असे ही म्हणतात. हे एक पित्तविषयक आजार आहे. जे काही कारंणास्तव शरीरात पित्ताचे प्रमाण जास्त झाल्यावर होते. पित्ताचे प्रमाण जास्त झाल्यावर हे अम्लीय होतात आणि शरीरास त्रास देतात. 
 
अतिआम्लता झाल्यास काय करावे जाणून घेऊ या..
या रोगात काय खाऊ नये-
नवीन अन्नधान्य, तिखट आणि मसालेयुक्त पदार्थ, मासे, मांसाहार, मद्यपान, गरम चहा कॉफी, दही, ताक, तूर डाळ, उडदाची डाळ याचे सेवन करणे टाळावे.
 
काय खावे-
ह्याचा रुग्णांना खडी साखर, आवळा, मनुक्का (बेदाणे), गुलकंद, लोकी (दुधी भोपळा), चवळी, कारलं, हिरव्या पाले भाज्या, डाळिंब, केळ्याचे सेवन करावे. नियमितपणे दुधाचे सेवन करावे.
 
हे उपाय करावे- 
1 ज्येष्ठ मधाचे चूर्ण बनवावे आणि त्याचा सेवनाने या रोगाचा नाश होतो.
 
2 कडुलिंबाचा सालीचे चूर्ण केल्याने किंवा सालीना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्याचे पाणी गाळून प्यायल्याने ह्या रोगापासून मुक्ती मिळते.
 
3 ह्या आजारासाठी सौम्य रेचक द्यावे. यासाठी त्रिफळा दुधात किंवा गुलकंद दुधाबरोबर द्यावे. दुधात मनुके उकळून द्यावे.
 
4 ताण तणाव कमी करण्यासाठी योग, आसन आणि औषधींचा वापर करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती