HealthTips :गर्भावस्थात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन हानिकारक करू नये

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (21:43 IST)
HealthTips :कोल्ड ड्रिंक्स पिणे प्रत्येकाला आवडते. अनेकांना दररोज कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असते. गर्भधारणा ही अशी स्थिती आहे जेव्हा स्त्रीला आवश्यकतेपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. असे म्हटले जाते की गर्भधारणेदरम्यान स्त्रीने दोन वेळ खावे. तथापि, या काळात विविध प्रकारच्या अन्नाची लालसा असणे स्वाभाविक आहे. गरोदरपणात महिलांना अनेकदा अनेक विचित्र इच्छा असतात.

काही स्त्रिया गरोदरपणात सोडा आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात.पण गरोदरकाळात महिलांनी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये. कोल्ड ड्रिंक्स मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे गरोदरपणात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन बाळासाठी धोकादायक असते. कोल्ड ड्रिंक्स मुळे महिलेचा गर्भपातही होऊ शकतो.कोल्ड ड्रिंक पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
 
साखरेचे प्रमाण वाढते-
कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गरोदरपणात त्यांचे सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेदरम्यान कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने महिलेला साखरेचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर त्यामुळे महिलेचा गर्भपातही होऊ शकतो.  
 
हाडांसाठी हानिकारक- 
गर्भधारणेदरम्यान कोल्ड्रिंक्सचे सेवन करणे देखील हानिकारक मानले जाते कारण यामुळे गरोदर स्त्रीच्या हाडांना नुकसान होऊ शकते. वास्तविक, कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ऍसिड आढळते जे हाडांसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे जन्मलेल्या मुलाची हाडेही कमकुवत होऊ शकतात.  
 
 पोषक तत्वांचा अभाव- 
या अवस्थेत महिलांनी आहारात पौष्टिक तत्वांचा समावेश करावा. सकस आणि पौष्टीक अन्न खावे. ज्यामुळे त्यांना सर्व पोषक तत्व मिळतील. आणि बाळाची वाढ चांगली होईल. महिलांनी या काळात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नये. या मध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात. हे पेय घेऊन शरीराला कोणताही फायदा होत नाही. या काळात नारळ पाणी, फळांचे रस, लिंबू पाणीचे सेवन करावे. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 
कॅफीनचे प्रमाण जास्त असते- 
या मध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. याचा अतिसेवनाने  आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे महिलांमध्ये निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तसेच पाण्याची कमतरता होऊ शकते. 
 
मुलांच्या वाढीसाठी हानिकारक- 
या अवस्थेत कोल्डड्रिंक्सचे सेवन केल्याने बाळाची वाढ कमी होते. मेंदूला हानी होते. गर्भावस्थेत सोडाचे सेवन केल्याने पोटातील बाळाची वाढी वर परिणाम होतो. बाळाचा शारीरिक व मानसिक विकास व्यवस्थित होत नाही. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती