सध्या बदलत्या जीवनशैली मुळे लहान वयातच शुगर, बीपी , हायपरटेन्शन सारखे आजार होतात. धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. फास्टफूड जंक फूड खाल्ल्याने शरीराला आजार होतात. जेवणात संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते. जंक फूड खाऊन वजन वाढते. आपल्या अन्नात फायबर पचनक्रिया निरोगी ठेण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे वजन नियंत्रित ठेवतात. आहारात फायबरयुक्त आहाराचा समावेश करावा. फायबरयुक्त आहार खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हे वाढत्या वजनावर देखील नियंत्रण ठेवते. या फायबरयुक्त भाज्यांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा.
काकडी-
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्याशिवाय त्यात भरपूर फायबर असते. हे खाल्ल्याने जास्त भूक लागत नाही. वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही काकडीचा सहज समावेश करू शकता. सालासह काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
मटार-
हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तुम्हाला हवे असल्यास, मटार ची भाजी, पराठा किंवा टिक्कीमध्ये देखील समाविष्ट करू शकता.