निरोगी राहण्याचे स्वदेशी मार्ग

शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (12:12 IST)
स्वस्थ शरीरातच स्वस्थ मेंदूचा निवास असतो. शारीरिकरीत्या सक्रिय असणारी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवते. कारण निरोगी व्यक्तीचे शरीर आणि मेंदू पूर्णपणे सक्रिय राहते.
 
निरोगी राहण्यासाठी, आपल्याला आपले मोठे लोकं जे जे लहान गोष्टी सांगतात, त्या खूप प्रभावी असतात आणि आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील बरोबर आहे. आम्ही तुम्हाला ते स्वदेशी मार्ग सांगू ज्याने तुम्ही नेहमी स्वस्थ राहाल.  
 
1. तांबेच्या भांड्यात पाणी पिणे फार फायदेशीर आहे. तांब्यामध्ये बॅक्टेरियल-किलर गुणधर्म असतात जे संक्रमण टाळतात. तांब्याच्या भांडीत ठेवलेले पाणी पित्ताशयासाठी देखील आरोग्यकारक असते.
 
2. शरीराला फक्त झोप न घेता संपूर्ण विश्रांती द्या. फक्त आठ तास झोपणे पुरेसे नाही, परंतु झोपायच्या आधी इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून दूर राहणे देखील गरजेचे आहे. कारण ते आपल्या मेंदूला हानी पोहोचवतात आणि पूर्ण विश्रांतीस परवानगी देत नाही. ज्यामुळे आपण 8 तासांची झोप घेतली तरी दुसर्‍या दिवशी फ्रेश वाटत नाही. 
 
3. खाण्यावर लक्ष केंद्रित करणे फारच गरजेचे आहे कारण अति-खाणे देखील आपल्या शरीराला नुकसान करते. म्हणून, आपल्या शारीरिक 
क्रियाकलापांनुसार आपला आहार निश्चित करा. कमी आणि हलके भोजनाचे सेवन करा, ज्याने पचन योग्यरीत्या होईल व चरबी किंवा मधुमेह सारखे आजार होण्याची शक्यता फारच कमी राहील.  
 
4. आपण जास्तकरून सर्व कामे बसूनच होतात. या दरम्यान आपली कंबर किंवा शरीराचे पोस्चर योग्य नसल्यास त्याच्या इतर अंगांवर अतिरिक्त दाब येतो ज्याने वेदना होऊ लागतात. म्हणून बसताना कमर अगदी सरळ बसावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती