Fitness Tips : झाडू-पोछा केल्याने फिट राहता येतं का? जाणून घ्या Expert Advice

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (09:01 IST)
सध्याच्या कोरोना काळात बहुतेक लोकं जिम आणि योगा क्लास पासून अंतरच राखून आहे. तसेच बरेचशे लोकं आपल्याला फिट ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक जाणारे देखील वॉकला जात नाही आहे. परंतु तंदुरुस्त राहणं देखील महत्त्वाचं आहे. आम्ही हे बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे की घरात देखील घरकाम करून फिट राहू शकतो. विशेषतः झाडून काढणं आणि लादी पुसण्याचं काम नियमितपणाने केल्याने कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. हे खरे आहे का? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही फिटनेस तज्ज्ञ अंकित त्रिवेदी यांच्याशी संवाद साधला. 
 
कॅलरी बर्न - 
अंकित त्रिवेदी सांगतात की फरशीवर बसून पोछा लावल्याने कॅलरीज बर्न होतात आणि जिम मध्ये आपण यासाठी तासंतास प्रयत्न करतो जेणे करून आपले शरीर तंदुरुस्त राहील. या वेळी आपण नियमानं झाडू- पोछा लावण्याचे काम करत असाल तर हे जिमप्रमाणेच कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं. जर आपण जिम जाऊ शकत नसाल तर आपल्या घराची स्वच्छता करा आणि आपले वजन कमी करा. 
 
पोटाची चरबी कमी करा - 
त्या लोकांनी आवर्जून लादी पुसायला हवी ज्यांचे पोट सुटत आहे. किंवा कंबरेच्या भोवती जास्त चरबी साठलेली आहे. तज्ज्ञ सांगतात की लादी पुसताना आपण पुढे वाकतो ज्यामुळे आपल्या पोटाचा आणि कंबरेचा व्यायाम होतो आणि या भागातील चरबी कमी होते. जेव्हा पण आपण लादी पुसता तेव्हा दर मिनिटास आपली सुमारे 4 कॅलरी जळते.
 
लादी पुसल्यानं आपल्या लोअर बॉडीची देखील कसरत होते. आपण जेव्हा खाली बसून पुसतो तेव्हा पुढे मागे सरकतो, त्याच बरोबर हातांना देखील उजवी -डावी बाजू कडे करतो. अश्या परिस्थितीत पोटाचे स्नायू आणि कंबरेचे स्नायू टोन होतात ज्यामुळे आपले शरीर टोन होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती