चिंच चे नाव जरी ओठावर आले की लगेच तोंडाला पाणी येत. चिंचेची आंबट-गोड चव मूड देखील सुधारते. याचा अधिक वापर पाणी पुरी साठी लागणाऱ्या पाण्यात आणि चटणी साठी केला जातो. अन्नाची चव वाढविण्यासह हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
चिंचेमध्ये असलेले घटक आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्सची आणि इतर घटकांची कमतरता पूर्ण करू शकतात. चला तर जाणून घेऊया चिंचेचे चमत्कारीक फायदे -
1. चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. चिंचेचे सेवन केल्याने डोळ्यातील त्रास, सर्दी-पडसं पासून आराम मिळतो . हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
2 पाचन तंत्र चांगले असले की आरोग्य चांगले राहते.चिंचेमुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि समस्या सुधारते. अपचनाची समस्या याचे सेवन केल्याने दूर होते.
3 या मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, पोटॅशियम, फायबर आणि मॅंगनीज सारखे पदार्थ आढळतात.
4 याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब ची समस्या कमी करण्यात मदत मिळते. या मध्ये असलेले घटक अँटीऑक्सीडेंट पातळीला वाढवते.
5 या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारात आराम मिळतो.
6 चिंचेचे सेवन केल्याने फायबरची पातळी वाढवते, ज्यामुळे भूक कमी लागते. या मुळे वजन कमी करण्यास मदत होते.
7 चिंचेमध्ये असणारे आयरन रक्ताची कमतरता पूर्ण करते. .या मुळे हिमोग्लोबिन वाढते.
8 चिंचेचे सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्तीची पातळी देखील वाढते यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉली सेचेराईड देखील असते ,जे आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते.
चिंचेचे सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे तोटे देखील आहेत. बर्याचदा ते शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार प्रतिक्रिया देतात. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे घ्या.