वारंवार मूड खराब होते, आनंदी राहण्यासाठी हे 7 पदार्थ खा

रविवार, 6 जून 2021 (17:35 IST)
एकेकाळी मूड खराब व्हायचे तर त्यासाठी अनेक पर्याय होते.परंतु सध्या कोरोनाच्या काळात हे सर्व मार्ग बंद झाले आहे.त्यामुळे सर्व आपापल्या  घरात आहे आणि वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करीत आहे.
बऱ्याच वेळा आपले मूड खराब होते,परंतु आपण काहीच करू शकत नाही.आणि आपली चिडचिड होते.आनंदी राहण्याचा मार्ग आपल्या पोटातून जातो हे आपल्याला माहित आहे का? काही अशा गोष्टी ज्यांना खाऊन आपण आपले मूड चांगले करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1  डार्क चॉकलेट- त्यात असणारे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म ताण कमी करण्यास मदत करतात. ते खाल्ल्याने आनंदी राहण्याचे हार्मोन्स वाढतात.
आपण नैराश्याने ग्रस्त असल्यास डार्क चॉकलेट नक्की खा.हे खाल्ल्याने हृदय देखील चांगले राहते.
 
2 कॉफी -यात उच्च प्रमाणात कॅफिन असते. जेव्हा मूड खराब असेल तेव्हा त्याचे सेवन केले जाऊ शकते. तथापि, ते केवळ मर्यादित प्रमाणात घेतले पाहिजे. कारण  कॉफीचे जास्त सेवन केल्याने निद्रानाश होऊ शकते.
 
3 केळी- केळीत असलेले व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. ते खाल्ल्याने मन आनंदी होते, मनःस्थिती फ्रेश होते.  आपण ते सकाळी दुधासह घेऊ शकता. दिवसभर मूड चांगले राहील.
 
4 अक्रोड - अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि मॅग्नेशियम असतात. अक्रोडच्या सेवनाने सेरोटोनिनचे प्रमाण वाढते, यामुळे आपली  आनंदाची पातळीही वाढते. दररोज सकाळी 2 अक्रोड खाणे आवश्यक आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम स्त्रोत आहे.
 
5 ओट्स- ओट्स ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करू शकतात. ज्यामुळे रक्त परिसंचरण चांगले होते. जर मूड खराब असेल तर एका भांड्यात दुधात ओट्स मिसळून खा. त्यात उपस्थित खनिज सेलेनियम थायरॉईड ग्रंथीच्या मूडला नियंत्रित  करण्यास देखील मदत करते.
 
6 ग्रीन टी- ग्रीन टी आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हे अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ऍसिडने समृद्ध आहे.हे सेवन केल्याने चा मूड सुधारतो.
 
7 रताळे - यात कार्बोहायड्रेट जास्त असतात. हे खाल्ल्याने सेरॉटेनिन पातळी वाढते जे आपल्या मूडला चांगले करण्यात मदत करत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती