आजच्या धकाधकीच्या जीवनात शांत, निवांत झोप मिळणं दुरापस्त झालंय. डेडलाइन्स पूर्ण करताना झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. यामुळे ताण वाढतोय. प्रत्येकाने शांत झोप घेणं गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते महत्वाचं ठरतं. मोनस्वास्थ्य जपण्याच्या या काही टिप्स...
गॅझेट्स लांब करा
झोपायाची तयारी सुरू असताना गॅझेट्स दूर ठेवा. सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअॅपमुळे आपण लोकांच्या सतत संपर्कात असतो. आपल्या झोपेवर गॅझेट्सचा विपरित परिणाम होऊ लागलाय. झोपेच्या वेळेत काम आणू नका. झोपण्याच्या तासभर आधी गॅझेट्सपासून दूर राहा.