त्वचेचा प्रकार कोणता ही असो अधिक काळा पर्यंत मास्क घातल्याने त्वचेमधून निघणारा घाम, चेहऱ्यावरील तेल आणि धूळ, या मुळे त्वचेशी संबंधित त्रास होऊ लागतात. मास्क लावणे आवश्यक आहे. श्वास घेतल्याने मास्कच्याआत ओलावा वाढू लागतो. तसेच त्वचेवर घर्षण सारखे त्रास वाढू लागतात. मास्क चा वापर केल्यानं नाकाच्या जवळ लाल पुरळ होतात.
* मास्क लावण्यापूर्वी क्रीम किंवा मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावावे.
* त्वचा संवेदनशील असल्यास नियासिनमेड बेस्ड ऑईन्मेंट्स चा वापर करावा. हे वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* मास्क चा वापर करताना मेकअपचा वापर कमी करावा.
* जर आपण घरात तयार केलेल्या कापडी मास्क चा वापर करत आहात तर त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या जेणे करून मास्कची घाण निघून जाईल.