गूळ आणि चणे खा आणि ताकद मिळवा

गुरूवार, 16 जून 2022 (08:00 IST)
भाजक्या चण्यासह गोड फुटाणे खातात परंतु चण्यासह गूळ खाणं जास्त फायदेशीर आहे.भाजक्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन,कॅल्शियम,व्हिटॅमिन आणि मुबलक प्रमाणात आयरन आढळते.या मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले आहे.शरीर आणि स्नायू बळकट करण्यासाठी भाजके चणे आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.गुळात व्हिटॅमिन ए आणि बी असतं.त्यात सुक्रोज, पोटॅशियम, झिंक आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळते.फारच कमी लोकांना याच्या फायद्या बद्दल माहित नाही.तर चला मग आज याच्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.
 
1 शरीराची पचन क्रिया बिघडल्यास चणे आणि गुळाचे सेवन करावे. या मध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे पचन शक्ती चांगली होते.
 
2 गूळ आणि चणे सेवन केल्याने दात मजबूत होतात आणि लवकर पडत नाही.
 
3  स्त्री आणि पुरुष दोघांनी गूळ आणि चणे खावे.हे खाल्ल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि अशक्तपणा जाणवत नाही.
 
4 गूळ आणि चणे खाल्ल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते.याचे सेवन केल्याने मेटॅबॉलिझम वाढते.आणि वजन झपाट्याने कमी होत.
 
5 दिवसातून एकदा 50 ग्रॅम चण्यासह गुळाचे सेवन करावे.या मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.तसेच संसर्गाचा धोका कमी होतो.
 
6 जर आपल्याला वारंवार युरिनचा त्रास होतो.तर गूळ आणि चणे खावे.या मुळे लवकर या त्रासातून आराम मिळतो.
 
7 मधुमेहाच्या रुग्णांना गोड खाण्यापूर्वी विचार करावा लागतो. परंतु ते गुळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करू शकतात.या बरोबर ते चणे खाऊ शकतात.गूळ आणि चणे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
 
8 गूळ आणि चणा एकत्र खाल्ल्याने त्वचेत चमक येतो.सुरकुत्या कमी होतात.तसेच उन्हापासून होणारे त्रास देखील दूर होतात.
 
टीप-  औषध,आरोग्य टिप्स, योग इत्यादी विषयांवर वेबदुनियामध्ये दिले जाणारे व्हिडिओ, लेख आणि बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती