जयमालातचं नववधूने वराला मारली थप्पड, व्हिडीओ व्हायरल !

शनिवार, 11 जून 2022 (17:53 IST)
लग्न म्हटलं की नव्या जोडप्याच्या मनात नवीन स्वप्न असतात. लग्नात मजा मस्ती असते.नवीन परंपरा नवी गोष्टी काळानुसार बदलताना दिसतात. जयमाला दरम्यान देखील अशा काही गमती जमती होतात की त्या नेहमीसाठी लक्षात राहतात. जयमाला मुलाला वर उचलणे , किंवा काही वेगळ्या पद्धतीने जयमाला एकमेकांना घालणे.  जयमालादरम्यान अनेकदा वधू-वर आनंदाने एकमेकांना मिठाई खाऊ घालतानाही पाहायला मिळत आहे, पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर जबरदस्तीने एकमेकांना मिठाई खाऊ घालताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान नववधूला अचानक राग येतो आणि मग ती चक्क नवरदेवाच्या कानशिलात  लागवते. लग्नाआधी जयमालाच्या वेळी अशी थप्पड मारणारी नवरी तुम्ही क्वचितच पाहिली असेल. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून त्याचा आनंदही घेत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashish Mishra (@asliashishmishra)

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर asliashishmishra नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत तब्बल 23 लाख लोकांनी बघितला आहे. या व्हिडिओला 22 हजार लाईक्स मिळाले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती