अंजीर अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ आहे. या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अंजीर जांभळे आणि हिरव्या अशा विविध रंगात येतात. फळ गोड, रसाळ आणि कुरकुरीत बियांनी भरलेले असतं. भारतात बहुतेक गोड आणि रसाळ फळ वाळलेल्या स्वरूपात सापडतं तसं पण वाळलेल्या अंजीरांच्या तुलनेत ताज्या अंजीरमध्ये कॅलरी आणि साखर कमी असते, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय बनतात.
सुके अंजीर देखील कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. अंजीरमध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. फायबर युक्त अंजीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. निरोगी पचन राखण्यासाठी फायबर देखील खूप महत्वाचे आहे. कदाचित म्हणूनच भिजवलेले अंजीर खाणे हा बद्धकोष्ठता बरा करण्यासाठी भारतातील सर्वात विश्वासार्ह घरगुती उपाय आहे.
अंजीर फायबरचा उत्तम स्रोत आहे. निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करण्यात प्रभावी ठरू शकते. फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतं.