दुधापासून बनलेला चहा आणि कॉफी आरोग्याला नुकसान करू शकतात का?

गुरूवार, 23 मे 2024 (20:30 IST)
भारतात लोकांची सकाळ चहा-कॉफी पासून होते. चहा-कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. सोबत उपाशीपोटी चहा कॉफी घेतल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. जसे की, पोटात जळजळणे, एसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
अनेक चिकित्सक दुधापासून बनलेला चहा पिण्यास नकार देतात. पण जर तुम्ही चहा घेत असाल तर चहा केव्हा आणि कसा प्यावा याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. 
 
जेवण केल्यानंतर लागलीच चहा-कॉफी घेऊ नये. कारण चहा कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. व अनेक आजार निर्माण होऊ शकतात. 
 
चहा पिण्याचे नुकसान-
चहा-कॉफीमध्ये कॅफिन सोबत टॅनिनचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे शरीरातील आयरन नष्ट होतात. सोबतच एनिमिया सारखे आजार लागू शकतात. अधिक चहा-कॉफी घेतल्याने ब्लड-शुगर, ब्लड प्रेशर, हृद्य विकार यांसारख्या समस्या वाढू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती