लौकी सोबत या गोष्टी खाऊ नका, नुकसान संभवते

शनिवार, 24 मे 2025 (22:30 IST)
Bottle Gourd Side Effects: दुधी भोपळा हा भारतीय स्वयंपाकघरातील निरोगी भाज्यांपैकी एक मानला जातो. हे विशेषतः उन्हाळ्यात खाल्ले जाते कारण शरीर थंड ठेवण्यासोबतच ते पचनासाठी देखील चांगले मानले जाते.
ALSO READ: उन्हाळ्यात अंडी खावी का? उन्हाळ्यात एका दिवसात किती अंडी खावल्या पाहिजेत ते जाणून घ्या
चुकीच्या अन्न संयोजनामुळे केवळ पचनसंस्थेलाच नुकसान होत नाही तर कधीकधी त्यामुळे अन्नातून विषबाधा किंवा पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. लौकी किंवा दुधी भोपळ्यासह या गोष्टी खाणे टाळावे 
 
दुधा सोबत दुधी खाणे टाळा 
 
काही लोक दुधासोबत दुधीचा हलवा किंवा दुधीची खीर बनवतात. पण दुधा सोबत लौकी किंवा दुधी भोपळा खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. दुधात प्रथिने आणि चरबी जास्त असते तर दुधीत ओलसर आणि थंडावा असतो. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेत समस्यां निर्माण होतात गॅस होऊ शकतो. तसेच अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते. 
ALSO READ: उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा
आंबटसह दुधी खाणे टाळा 
काही लोक दुधी भोपळ्याच्या भाजीत लिंबू किंवा टोमॅटो घालतात दुधीसोबत आंबट पदार्थ टाकल्याने पोटात जळजळ होऊ शकते. आणि दुधीतील आवश्यक घटक कमी होतात. निरोगी राहण्यासाठी दुधीत आंबट पदार्थ टाकणे टाळावे. 
ALSO READ: उन्हाळ्यात काकडीचे सेवनाचे फायदे जाणून घ्या
कारले आणि दुधी एकत्र खाणे टाळा 
कारले आणि दुधी या आरोग्यदायी भाज्या आहेत. त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहे. कारले हे उष्ण प्रकृतीचे आहे तर दुधी थंड आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आम्लपित्त, जळजळ किंवा थकवा येणे सारख्या समस्यां उदभवू शकतात. म्हणून या दोन्ही भाज्या एकत्र खाणे टाळा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती