घराच्या जवळ रातराणी लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

मंगळवार, 26 मे 2020 (12:56 IST)
रातराणी ज्याला चांदणी देखील म्हणतात. रातराणीच्या फुलांचा गंध सर्वत्र दरवळत असतो. ह्याचे लहान लहान फुले गुच्छ मध्ये असतात. फुले रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी मावळतात. यामुळे ह्याला रातराणी म्हणतात. 
 
सदाहरित झुडूपं असलेली रातराणी 13 फुटापर्यंतची असू शकते. ह्याची पाने सरळ, अरुंद सूरी प्रमाणे लांब, गुळगुळीत आणि चमकदार असतात. फूल पातळ ट्यूबलर सारखे हिरवे आणि पांढरे असतात. जाणून घेउया याचे 5 आश्चर्य कारक फायदे.
 
1 रातराणीचे किंवा चांदणीचे फूल वर्षभरातून 5 किंवा 6 वेळा येतात. प्रत्येकी वेळी 7 ते 10 दिवसात आपला गंध सर्वत्र दरवळतात. याने वास्तुदोष दूर होतो.
 
2 रातराणी किंवा चांदणीचा गंध घेतल्याने जीवनातील सर्व वेदना नाहीश्या होतात, मानसिक ताण कमी होतो. स्नायू रोगात रातराणीचा आणि त्याचे फूल फायदेशीर असतं. रातराणीच्या सुगंधाने सर्व प्रकाराची काळजी, भीती दूर होते. 
 
3 रातराणीच्या फुलांचे गरजे तयार केले जातात. जे केसात माळले जाते. हे माळून बायका नेहमी आनंदी राहतात.
 
4 रातराणीच्या फुलांनी अत्तर देखील बनवले जाते. मानसिक ताण दूर करण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शयनगृहात आणि आंघोळ करताना रातराणीच्या अत्तराचा वापर केले पाहिजे. रातराणीच्या अत्तराने स्नान केल्याने किंवा सुगंध घेल्याने डोके दुखीचा त्रास कमी होतो. सकाळी रातराणीच्या सुगंधी पाण्याने आंघोळ करावी. जेणे करून दिवसभर शरीरात ताजेपणाची भावना येते आणि घामाच्या वासांपासून सुटका होते.
 
5 रातराणीच्या सुगंधांचा मनावर आणि मेंदूवर सखोल प्रभाव पडतो. ज्यामुळे आपल्या विचारांवर त्याचा फरक पडतो. आपली सकारात्मक विचारसारणी होऊ लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती