Abortion Pill अबॉर्शन पिल्सचे 5 साइड इफेक्ट्स

बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (19:24 IST)
बर्‍याच वेळा अनवांटेड प्रेग्नेंसीपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला न घेता अबॉर्शन पिल्स घेऊन घेतात. पण असे करणे चुकीचे आहे. या पिल्स घेतल्याने याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 
 
1. डोकेदुखी
गोळी घेतल्याने नेहमी डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकतात. कधी कधीतर ताप देखील येतो किंवा अंगदुखी होऊ लागते. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणे फारच गरजेचे आहे. 
2. मळमळ होणे   
या गोळ्यांमुळे मळमळ किंवा उलटी सारखे वाटते. कधी कधी पोटात मरोड येते आणि डिहायड्रेशनचा त्रास देखील होतो. 
3. होऊ शकते सर्जरी 
काही प्रकरणात असे देखील बघण्यात आले आहे की गोळ्यांच्या प्रभावामुळे भ्रूण पूर्णपणे शरीराच्या बाहेर येत नाही अशा वेळेस सर्जरी करून त्याला बाहेर काढावे लागते. 
4. पोटदुखी 
या गोळ्यांचे सेवन केल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. या औषधांचे साइड इफेक्टमुळे पोट, पाय आणि शरीरातील बर्‍याच भागांवर सूज देखील येऊ 
शकते. 
5. जास्त ब्लिडिंग 
आईपिल घेतल्यानंतर गर्भाशयाचे संकुचन ब्लिडिंगचे प्रमाण वाढवून देतो. जर वेळेवर याचे उपचार केले नाहीतर ही समस्या बर्‍याच वेळेपर्यंत राहते. याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतो. याच्याकडे दुर्लक्ष करू नये. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती