Video : केव्हा आणि का प्यायचे पाणी !

पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत करतं. ज्याप्रकारे अंघोळ केल्याने बाह्य शरीराची सफाई होते त्याचप्रमाणे पाणी पिण्याने आतल्या शरीराची सफाई होते. पाहू या पाणी किती आणि कधी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.



नियम:

* सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी पिण्याने आपले अंतर्गत अवयव मजबूत होतात. सकाळी पाणी थोडे कोमट करून पिण्याने फॅट्स कमी होतात.

* अंघोळीनंतर 1 ग्लास पाणी पिण्याने कधीही लो ब्लड प्रेशरची तक्रार होत नाही.

* जेवण्याच्या 30 मिनिटांआधी 2 ग्लास पाणी पिण्याने पचन शक्ती वाढते.

* जेवताना पाणी न पिता जेवण झाल्यावर पाऊण तासाने पाणी प्यावे.

* पाणी कधीही उभे राहून पियू नये.

* हडबडीत एकाच वेळी तांब्याभर पाणी पियू नये.

* झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिण्याने हार्ट अटैक सारख्या त्रासापासून सुटका मिळते.

पुढे वाचा पाणी पिण्याचे फायदे:
फायदे:

* सतत पाणी पिणार्‍यांना मूत्रखडा विकार होण्याची शक्यता नगण्य असते.

* जर शरीरातून 10 टक्के द्रव्यदेखील कमी झाले तरी डिहाइड्रेशनची होण्याची शक्यता असते. म्हणूनच किडनीला स्वस्थ ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते.

* तज्ज्ञांना म्हटले आहे की भरपूर पाणी पिण्याने चेहर्‍यावर चमक येते.

* भरपूर पाणी पिण्याने सुरकुत्या नाहीश्या होतात आणि डोळ्यांखालील फुगीरपणा कमी होतो.


पुढे वाचा पुरेसे पाणी न पिण्याचे तोटे
तोटे:

* पुरेसे पाणी न पिण्याने शरीराची काम करण्याची गती कमी होते.

* आवश्यकतेनुसार पाणी न पिण्याने शरीरातील तापमान वाढतो आणि तो रोगांना आमंत्रण देतो.

* अन्न पचविण्यासाठी पोट ऍसिडीक द्रव्याची निर्मिती करतो. म्हणून शरीराला हव्या असलेल्या प्रमाणात पाणी नाही मिळाले तर पोटात ऍसिड बनत राहतं.

* शरीरात पाण्याच्या कमीमुळे डोके दुखी, दुर्बलता आणि थकवा येतो आणि विचार करण्याची शक्ती कमी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती