वजन कमी केल्याने येते चांगली झोप

बुधवार, 2 जुलै 2014 (12:48 IST)
ज्यांना जास्त वजनाचा त्रास होतो त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. पेनिसिल्वेनिया विश्वविद्यालयाने याबाबत संशोधन केले.

स्थूलपणा कमी केल्याने तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. वजन कमी करण्याचा संबंध हा दीर्घ झोपेशी आहे, हे संशोधनाने स्पष्ट झालेय, अशी माहिती विश्वविद्यालयाचे मुख्य संशोधक नसरीन अलफारीस यांनी दिली. अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की, वजन कमी केल्याने सहा महिने चांगली झोप येते. तसेच आपला स्वभावही ठीक राहतो.  

वेबदुनिया वर वाचा