बटाटा वेफर्समुळे होतोय कर्करोग

सोमवार, 7 जुलै 2014 (16:28 IST)
वेगवेगळ्या ब्रँडचे बटाटा वेफर्स लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनाच आवडतात. मोठी माणसे उपवासासाठी बाकी फराळाच्या पदार्थांपेक्षा चटकमटक वेफर्सवर ताव मारणे अधिक पसंत करतात. वेफर्स खाणे हा एक चांगला टाईमपास आहे. बरेचदा टीव्ही बघताना किंवा करमत नसल्यास तोंडात टाकण्यासाठी वेफर्स खाल्ले जातात. लहान मुलांचा रुसवा काढण्यासाठी तर आवर्जून वेफर्स हाच खाऊ असतो. पण बाजारात मिळणारे हे बटाटा वेफर्स आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

नुकत्याच केल्या गेलेल्या एका संशोधनातून बटाटा वेफर्स कर्करोगाचं निमित्त ठरत असल्याचं सिद्ध झालंय. या शोधानुसार फास्ट फूडमध्ये मोडणारे वेफर्स बनवणारे आणि खाणारे अशा दोघांनाही कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, असे समोर आले आहे. संशोधकांनी अति उच्च तापमानावर तळलेल्या वेफर्समध्ये एक्रिमालाईड रसायनाचा शोध लावला आहे. या रसायनामुळे वेफर्स बनवण्याच्या पद्धतीमुळेही कर्करोग होऊ शकतो. एक्रिमालाईड एक कारसिनाजेन आहे. १२0अंश सेल्सिअस तापमानाच्या वर बनवल्या जाणार्‍या बिस्किट, ब्रेड, कुरकुरे, वेफर्स अशा पदार्थांमध्ये हा पदार्थ सापडतो.

वेबदुनिया वर वाचा