दोन मिनिटांचा व्यायाम मधुमेह रोखू शकतो

गुरूवार, 29 मे 2014 (14:10 IST)
आठवडय़ातून केवळ दोन मिनिटे काटेकोरपणे व्यायाम केल्यास दुसर्‍या प्रकारचा मधुमेह रोखण्यास मदत मिळू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

ज्या व्यक्तींना वेळ कमी असतो पण त्यांना आपल्या आरोग्याची काळजी असते, अशा व्यक्तींसाठी व्यायामाची ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरेल, असा दावा इंग्लंडमधील अँबर्टे विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या अभ्यासात केलेल्या पाहणीनुसार जास्त वजन असलेल्या प्रौढांना ज्यांना मधुमे ह होण्याचा   धोका जास्त असतो अशा लोकांना आठ आठवडय़ांमध्ये अति तीव्रतेचा व्यायाम करवून घेतला गेला. या व्यायामामध्ये दोनदा कमी अंतर भरधाव वेगाने धावणे, बाइकवर व्यायाम करणे याचा समावेश होता. एका आठवडय़ाच्या या व्यायामध्ये प्रत्येक सत्रात दोन मिनिटे दहा वेळा कमी अंतर भरधाव वेगाने धावणे असा व्यायाम करवून घेतला गेला.

या शॉर्ट बट स्वीट आणि अति उच्च क्षमतेच्या व्यायामामुळे हृदयाशी संबंधित आरोग्यमध्ये लक्षवेधी सुधारणा झाल्याचे दिसून आले. रक्त प्रवाहामधील साखर लक्षणीरीत कमी होण्याची समर्थता त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये दिसून आली. इतक्या लहान व्यायामुळे एवढा ङ्कोठा फायदा झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. यापूर्वी संशोधकांच्या याच गटाने आठवडय़ातून तीन वेळा व्यायामाचा प्रयोग यशस्वी केला होता. मात्र त्यांनी नव्याने केलेल्या या प्रयोगामुळे त्यांच्या मागील प्रयोग झाकला गेला आहे.

वेबदुनिया वर वाचा