तळपाय चमकेल तर चेहरा दमकेल!

ND
तळपाय म्हणजे शरीराचा दुसरा हृदय असतो कारण तळपायावर एक गादीप्रमाणे मांसाचा भाग असतो, ज्यावर बरेच रोम छिद्र असतात. यांचे आकार त्वचेच्या रोम छिद्राहून मोठे असतात. जेव्हा आम्ही चालतो तेव्हा या गादीवर पूर्ण शरीराचा भार पडतो. त्याने रोम छिद्र खुलतात. या रोम छिद्रांच्या माध्यमाने ऑक्सिजन आत जात जाते आणि गादीत आलेले टॉक्सीन घामाच्या माध्यमाने बाहेर येत. जसेच तळपायांच्या स्पंजावर दाब पडतो तसेच रक्त वाहिन्यांवर दाब पडतो आणि रक्त तेजीने वर ढकलण्यात येतं. म्हणून पायी पायी चालल्याने हृदय रोग्यांना सर्वाधिक फायदा होतो.

जर तळपाय खराब, फाटलेले असतील तर शरीरातील त्वचा देखील त्या प्रकारची असेल. त्यासाठीच तळपायाची नियमित सफाई व मालीश केल्याने शरीरातील त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि चांगले रक्त मिळण्यास मदत मिळते.

तळपायांच्या देख रेखीसाठी सल्ला

रात्री झोपण्या अगोदर तळपायांची स्वच्छता करावी आणि 3 मिनिट गरम पाण्यात व नंतर 1 मिनिट गार पाण्याने शेक घेतला पाहिजे.

तळपायांची नियमित मालीश केली पाहिजे. मालिशासाठी तेलाची निवड तळपायांच्या प्रकृतीनुसार केली पाहिजे. कोरडी आणि घाम सोडणारी त्वचेसाठी वेसलीन आणि चंदन तेल मिसळून मालीश करावी. मुलं आणि महिलांची कोरडी त्वचा असेल तर त्यासाठी जैतूनचे तेल व चाल मोगऱ्याचे तेल मिसळून मालीश करावी, भेगा पडलेल्या तळपायांना सरसोचे तेल, वेसलीन आणि लिंबू मिसळून त्याची मालीश करावी.

सकाळी अंघोळ करताना हलक्या हाताने तळपायांना रगडून स्वच्छ करावे व अंघोळीनंतर सरसोचे तेल लावावे.

उंच हिल्सच्या चपला, सँडिल आणि जोड्यांचा वापर कमी करावा कारण त्याने रक्तप्रवाह असामान्य होतो.

दररोज 15 ते 20 मिनिट बीन चपलांचे गवतावर किंवा हलक्या मातीवर नक्की फिरावे.

वेबदुनिया वर वाचा