आरोग्य सल्ला

पुरेशी झोप केवळ स्थूलपणा रोखते, एवढंच नाही तर अशा माणसांना टाइप-२ चा मधुमेह होण्याची शक्यताही कमी होत जाते. जी माणसं जास्त जागतात, त्यांना जास्त भूक लागून त्यांचा आहार वाढतच जातो. 
 
मोठ्या माणसांनी आठ तास तरी झोपायला पाहिजे. लहान मुलांनी किमान दहा तास झोप घ्यायला हवी. आणि टीनएजर्सनी नऊ ते साडेनऊ तास झोपायला हवं. इतकी झोप म्हणजे आरोग्याची हमीच.
 
बद्धकोष्ठात घरच्या घरी काही उपाय करून पाहा. आहारात कडधान्यं, पालेभाज्या, फळं भरपूर ठेवा. मैद्याऐवजी अख्खा गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर दवपदार्थ घ्या, फक्त दारू आणि कॉफी टाळा. सारखं रेचक घेऊ नका.
 
अस्थमासारख्या जुनाट आजारावर योगसनांमुळे उतार पडत असल्याचा अनुभव आहे. योगासनांचा फायदा किरकोळ सर्दी-खोकला, पोटाचे आजार दूर ठेवण्यास नक्कीच होतो. वाढत्या वयाच्या मुलांनाही योगसरावाचा खूप उपयोग होतो. त्यांच्या शरीराची आणि मनाची योग्य वाढ होण्यास मदत मिळते. 
 
एकमेकांचे कपड्यांचा वापर करू नये. त्याबरोबरच दुसर्‍यांचे कंघवा टॉवेल व इतर वस्तु उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी
वाढतात.
 
मनाची एकाग्रता शक्ती वाढवण्यास योगसराव फायदेशीर ठरतो. सामान्य माणसाला चिंता दूर ठेवून निकोप आणि निरोगी आयुष्य जगण्यास योगविद्या मदत करते. 
 
वेलदोडा चघळणं, हा श्वासाच्या दुर्गंधीवर प्रभावी असा उपाय आहे. यामुळे तोंडाला दुर्गंधी येणार नाही. शिवाय अती प्रमाणात लागणारी तहानही कमी होईल.

वेबदुनिया वर वाचा