आता प्या नॅनो चहा

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (11:39 IST)
चहा हे जगातील असंख्य लोकांचे आवडते पेय. चहा कित्येक शतकांपूर्वी माणसाला गवसला आणि जपान, चीनसारख्या देशांत त्यावर महाकाव्येही रचली गेली. चहा हे त्या देशातील संस्कृतीचे प्रतीक बनले. तरतरी आणणारे हे पेय अनेक स्वरूपात आले. पत्ती चहा, ग्रीन टी, हर्बल टी, भुकटी चहा, फॅमिली मिक्चर चहा असे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. अलिगड मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांनी खाण्यापिण्याच्या वस्तूंचाच वापर करून आता नॅनो चहा बनविला आहे आणि त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला गेला आहे. हा चहा उत्तम गुणवत्तेचा तर आहेच पण बरोबरीने स्वादिष्टही आहे. विद्यापीठाचे मुख्य को ऑरडीनेटर प्रो. एम आलमि एच नकवी आणि वैज्ञानिक डॉ. ब्रजराजसिंह गेली सहा महिने हा चहा तयार करण्यासाठी संशोधन करत होते. हा नॅनो चहा अँडी ऑक्सिडंट आहे तसेच त्यात कॅफिन नाही आणि टॅनिनही नाही. शिवाय तो खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून बनविला गेला असल्याने पेस्टीसाईडचा धोकाही नाही. हा चहा ग्रीन आणि ब्लॅक टी पेक्षाही उत्तम असल्याचा त्यांचा दावा आहे आणि मुख्य म्हणजे तो स्वस्तही आहे. 100 रूपयांत 2 हजार कप चहा तयार करता येतो. म्हणजे पाच पैशांत 1 कप चहा. चहा तयार करण्याची कृती सामान्य चहाप्रमाणेच असून तो द्रव आणि घन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. या चहामुळे पोटाचे रोग होण्यास प्रतिबंध होतो असाही दावा या संशोधकांनी केला आहे.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

वेबदुनिया वर वाचा