थंड वारे टाळण्यासाठी हे महत्त्वाचे उपाय

मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (09:38 IST)
देशभरातील अनेक भागात थंडीची लाट सुरूच आहे आणि थंड वाऱ्याने लोकांना चांगलेच हैराण केले आहे. लोक सूर्य प्रकाश बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. हिवाळ्यात वाहणारे थंड वारे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकतात. वृद्ध लोकांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या लाटेमुळे मृतांचा आकडा वाढला आहे.
 
थंडीचा जोर वाढला की काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. या दरम्यान तुम्ही चहा, कॉफी इत्यादी गरम पदार्थ प्यावे. आल्याचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. याने शरीराचे तापमान जास्त राहील.
 
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेेष करुन मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे. अल्कोहोल शरीराचे तापमान कमी करतंं. हे थंड हवामानात हानिकारक ठरू शकतं. शिवाय हिवाळा टाळण्यासाठी उबदार कपडे घालावे. डोक्यावर टोपी लावावी जेणेकरून थंड हवा कानापर्यंत पोहोचू नये.
 
NDMA नुसार, तुम्ही हातमोजे ऐवजी मिटन्स वापरू शकता. मिटन्स अधिक गरम मानले जातात कारण यामध्ये बोटे वेगळी नसतात, अशात संपूर्ण शरीरात उष्णता राहते. अशा प्रकारे आपण थंडीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. या व्यतिरिक्त आपण हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आहारात काही खाद्यपदार्थ देखील समाविष्ट करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती