नाक बंद होण्याच्या समस्याने त्रस्त आहात हे उपाय करा

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (20:23 IST)
दररोज आपण कोणत्या ना कोणत्या समस्येने वेढलेलो असतो, ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. अशाच एक त्रास आहे नाक चोंदणे किंवा नाक बंद होणे. या मुळे डोकं दुखत, अंग दुखी, अस्वस्थपणा सारखे बरेच त्रास उद्भवतात. नाक चोंदणे किंवा बंद होण्याला सायनोसायटिस किंवा सायनस म्हणतात. हिवाळ्याच्या हंगामात नाक बंद होण्याचा त्रास उद्भवतो, ज्यामुळे लोक आजारी पडतात. जर आपल्याला देखील असा त्रास आहे तर आम्ही सांगत आहोत काही अशे उपाय ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल.  
 
* गरम पदार्थांचे सेवन - 
आपण देखील नाक बंद होण्याच्या त्रासाने अस्वस्थ आहात तर या त्रासांमध्ये आपण काही गरम वस्तूंचे सेवन करू शकता. जेव्हा आपण गरम वस्तू खाता तेव्हा या गरम वस्तू आपल्या घशाला आणि नाकाला आराम मिळवून देतात. या साठी आपण गरम पाणी किंवा गरम वरणाचे सेवन करू शकता. किंवा चहा कॉफी पित असाल तर ते देखील पिऊ शकता. असं केल्यानं बंद नाक त्वरितच उघडते.
 
* मोहरीच्या तेलाची मॉलिश -
बंद नाक उघडण्यासाठी मोहरीच्या तेलाची मॉलिश देखील करू शकता. या साठी आपल्याला हे करायचे आहे की मोहरीच्या तेलात लसणाची एक पाकळी आणि थोडंसं ओवा घालून गरम करावं. हे तेल थंड झाल्यावर हळुवार हाताने मॉलिश करायची आहे. हे तेल नाकाच्या वर लावल्यानं बंद नाक उघडेल. लसणाची प्रकृती उष्ण  आहे जी उष्णता देते. आपण लसणाच्या कच्च्या पाकळ्या देखील खाऊ शकता.
 
* गरम पाण्याची वाफ-  
बंद नाक उघडण्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. या साठी पाणी गरम करा. त्यामध्ये ओवा घाला आणि त्याची वाफ घ्या. आपल्याला पाण्याच्या भांड्यात चेहरा वाकवून डोक्यावर कापड टाकून झाकून घायचे आहे. जेणे करून वाफ नाकात शिरेल. असं केले नाही तर आपल्याला आराम मिळणार नाही. डोकेदुखी, मळमळणे सारख्या त्रासांमध्ये देखील आराम मिळेल.
 
*  मध आणि काळी मिरी-
आपली बंद असलेली नाक उघडण्यासाठी मध आणि काळी मिरी नाक उघडण्यात मदत करेल. या साठी आपल्याला एक चमचा मधात एक लहान चमचा काळी मिरपूड घालायची आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्याचे सेवन करायचे आहे. हे फायदेशीर आहे. या शिवाय दुधात आलं घालून त्याला उकळवून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घ्या. असं केल्यानं आराम मिळेल.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती