जसलोक रुग्णालय व रिसर्च सेंटर मध्ये एससीए 12 या रोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी

शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (13:53 IST)
संपूर्ण शरीर विकलांक करून टाकणारा आजार म्हणजे 'स्पायनो सेरेबेलार अटॅक्सिया' (एससीए). एड्स, कॅन्सरप्रमाणेच असाध्य असलेल्या या आनुवंशिक आजारावरील जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हि किमया केली आहे जसलोक रुग्णालय व रिसर्च सेंटर मधील डॉ. परेश दोषी आणि त्यांच्या टीम ने.
 
माया, या ५७ वर्षीय गृहिणी, खारघर इथे राहतात. एससीए-१२ या आजाराची प्रचिती त्याना होण्याआधी त्यांच आयुष्य सुरळीत सुरु होतं. २००३ पासून त्याना अचानक डोक्यात कंपने जाणवू लागली. काही दिवसांनी ही कंपने उजव्या हातात आणि मग डाव्या बाजूला जाणवू लागली. आजाराची तीव्रता वाढल्यानंतर माया यांना रोजच्या कामात तसेच चालताना देखील अडचणी निर्माण होऊ लागल्या. काही वर्षानी म्हणजे २०१४ पर्यंत या आजाराचे प्रमाण इतके वाढले की त्यांना आधाराशिवाय चालता येणे अशक्य झाले. माया यांनी जसलोक रुग्णालयात चौकशी केल्यावर इथल्या डॉक्टरच्या टीमने या आजारावर रिसर्च केल्यावर शस्त्रक्रियेचा निष्कर्ष काढला.
 
एससीए-१२ हा आजार अनुवांशिक, शरीराची झीज होणारा किंवा जीवघेणा ही ठरू शकतो. हा आजार कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यावर काही दिवसांपूर्वी काहीच उपचार पद्धती नसल्याचं दिसून आल होतं. तथापि हा आजार अप्रभावी किंवा प्रबल जनुकांमुळे झाल्याच दिसून आला आहे. या आजारात सुरुवातीला हातात कंपन येणे, आणि मग चालण्या मध्ये अडचण येणे ही लक्षणे दिसून येतात. मात्र याच प्रमाण वाढल्यावर डोळ्यांच्या हालचाली तसेच बोलण्यातही परिणाम होतो. जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटर्सचे डॉ. परेश दोषी यांनी यावर बोलताना सांगितले की, एससीए-१२ या आजारावर अद्याप कोणतीही उपचार पद्धति नव्हती. रिसर्च केल्यानंतर आम्ही उपलब्ध असलेल्या तर्क पद्धतीच्या आधारावर ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.
 
आमच्या प्रत्येक रुग्णाला आम्ही योग्य उपचारपद्धति मिळेल अशी खात्री देतो. रुग्णांना एक अनुभवात्मक आरोग्य देऊन त्याना जगण्याचे असामान्य ध्येय मिळत असल्याचही जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटर चे सीईओ डॉ. तरंग यांनी म्हटल आहे.

वेबदुनिया वर वाचा