सकाळची न्याहारी किती आवश्यक आहे !

गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (15:15 IST)
सकाळचा न्याहारी शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे सर्वजण जाणत असूनही अनेक लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडतात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांच्या शरीरावर होतात. 
 
सकाळचा नाश्ता निरोगी राहण्यासाठी फार महत्वाचा आहे. नाश्ता शरीरात उर्जा निर्माण करतो. नाश्ता करणारे लोक नाश्ता न करणार्‍या लोकांपेक्षा अधिक धडधाकट असतात. सकाळी उठल्यानंतर एक तासात नाश्ता करायला हवा. नाश्ता केल्याने मेंदूला चालना मिळते व एकाग्रता वाढायलाही मदत होते. शाळा-कॉलेजांत जाणारी बरीचशी मूल जी नाश्ता करत नाही, त्यांच लक्ष्य अभ्यासात केंद्रित होत नाही. पण समतोल नाश्ता घेतला तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. 
 
सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिज, व्हिटॅमिन, फायबर, कार्बोहायड्रेट इत्यादी घटकांचा समावेश करा. नाश्त्यामध्ये भाज्या, फळं, दुध, मोड आलेले कडधान्य, पनीर, दही, सालीच्या डाळी इत्यादींचा समावेश करा. तसेच संमिश्र भाज्या मिळवलेले पोहे, ओट्स, उपमा, दालिया, चीलाल चपाती, इडली, उकडलेले अंडे इत्यादी घेऊ शकता. 
 
सकाळचा नाश्ता केल्यास हृदयरोग, अल्सर, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती