काही काही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीच संबध नसतो. पण सत्य विलक्षणच असतं.
आता हेच पहा. आजकाल आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे कॅन्सरचे बरेचसे पेशंट आपल्याला दिसतात. त्यातही पोटाच्या कॅन्सरचे. यात एकाएकी वाढ कशी होते याचा अभ्यास करताना काहीच संबंध नसलेली एक गोष्ट समोर आली आणि डोके चक्रावलं. स्वतःच्याच संशोधनावर विश्वास बसेना. असंही असू शकतं?
फ्रीजमधील वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध?
पण आहे. चिंचेपासून चिकनपर्यंत, मिरच्यांपासून मटणापर्यंत, साबुदाण्यापासून सोयासॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, दूध, दही भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये, ही महिलांची वृत्ती. इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळं, कालची शिल्लक राहिलेली डाळ, दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण करून शिजवलेली भाजी, सर्व प्रकारची कडधान्ये, अंडी, वेगवेगळी मसाला पाकीटं तीही उघडी, एक ना धड भाराभर वस्तू!
या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे. कॅन्सरचे विषाणु येथेच तयार होत आहेत. अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. पण 1000 व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील 538 जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे आणि आश्चर्य म्हणजे या 538 ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता.
फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा.
मटण चिकन मेरीअनेट करण्यापुरतं.. आठ आठ दिवस नाही. चणाडाळीचं पीठ, जोंधळा पीठ, कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा. भाजी दोन दिवसात संपेल एवढीच. दूध 48 तासात वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या.