8 जून : 'World Brain Tumor Dayलक्षण आणि उपचार पद्धती जाणून घ्या

सोमवार, 7 जून 2021 (20:33 IST)
'वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे' किंवा 'जागतिक मस्तिष्क ट्युमर दिवस ' दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू लोकांना या रोगाबद्दल जागृत करणे आहे.चला ब्रेन ट्युमर म्हणजे काय ,त्याची सामान्य लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेऊ या.
 
ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?
 
ब्रेन ट्यूमर हा एक धोकादायक रोग आहे ज्यामध्ये मेंदूत ट्यूमर तयार होण्यास सुरवात होते. यात हळूहळू पेशींची गाठ होणे सुरु होत.या गाठींनाच ट्युमर म्हणतात.जेव्हा हे ट्युमर मेंदूत शिरतो त्याला ब्रेन ट्युमर म्हणतात.कालांतराने ते मेंदूचा कर्करोग म्हणून ओळखले जाते. 
वेळेवर योग्यप्रकारे उपचार न केल्यास ते प्राणघातक होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर 3 ते 12 किंवा 15 वर्षे वयाच्या किंवा 50 वर्षांच्या वयानंतर होतो. हा आजार पुरुष किंवा स्त्री कोणालाही होऊ शकतो.
 
चला, ब्रेन ट्यूमरची काही सामान्य लक्षणे जाणून घ्या -
1 डोकेदुखी हे मेंदूच्या ट्यूमरचेही लक्षण आहे, जे बहुदा सकाळी खूप तीव्र होते आणि दिवस जसजसा सरत जातो तसतसे डोकेदुखी कमी होऊ लागते.ही वेदना सहसा डोक्याच्या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला जास्त असते.
 
2 या वेदनेच्या सुरूवातीस, साध्या वेदनाशामक औषधे आराम देतात, परंतु नंतर या औषधांचा प्रभाव देखील संपतो, त्याचप्रमाणे डोकेदुखीची तीव्रता देखील वाढते.
 
3 मेंदूच्या ट्यूमरमध्ये डोकेदुखीची तीव्रता तसेच शरीरातील चैतन्याची विकृती, एखाद्या विषयावर वारंवार विचार करण्याची शक्ती वापरतात, दृष्टीत बदल होणे, चालणे, स्पर्श करणे, गंध येणे, ऐकणे इत्यादी क्रियांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू लागतात. 
 
4 मेंदूत किंवा त्याच्याशी संबंधित क्रियाकलापांमध्ये अचानक बदल होतो. हा बदल मेंदूच्या अनावश्यक पेशींच्या वाढीमुळे होतो, जे शरीराच्या इतर कोणत्याही भागांवर असलेल्या गाठ किंवा जखमांचे प्रतिरूप आहे. त्याची  विकासाची गती वेगवान झाल्यामुळे डोके तसेच गळ्यामध्येही वेदना होऊ लागते आणि रूग्ण अचानक बेशुद्ध होऊ शकतो.
 
या आजारासाठी उपचार पद्धती-
1 या आजाराचे उपचार काही प्रमाणात रोगाच्या लक्षणांद्वारे आणि चाचणीद्वारे शक्य होतात. तथापि, चाचणीनंतर, या रोगाची पुष्टी विशिष्ट चाचण्यांद्वारे केली जाते, जसे डोक्याचा एक्स-रे, कॅंट स्कॅन, पाठीच्या   कणातुन पाण्याचे परीक्षण. सध्या या आजाराच्या सुरुवातीच्या काळात ब्रेन ट्यूमरवर उपचार करणे खूप सोपे झाले आहे.
 
2 या आजाराच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया, रेडिओ थेरपी आणि औषधे प्रभावी सिद्ध झाले आहेत. रोगाच्या स्थितीनुसार उपरोक्त पद्धतींनी उपचार केले जातात.
 
3 व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे डोकेदुखी असो सतर्क असले पाहिजे.हे लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचण्या करून याची पुष्टी करावी.कारण कोणत्याही रोगाचा उपचार सुरुवातीच्या काळात सहजरित्या करता येतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती