ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम होतो का? जर तुम्ही ट्रेन, जिम, ऑफिस किंवा रिसॉर्टमध्ये जीवाणूंबाबत चिंताग्रस्त असाल आणि त्यांना हॅण्ड जेलद्वारे मात देण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.
खरंतर लिक्विड हॅण्ड जेल तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान देईल, पण त्याचा प्रभाव फार नसतो. अनेक वेळा तर त्याचा उलट परिणाम होतो. पण तुम्हाला लिक्विड हॅण्ड जेलबाबत जेवढी माहिती आहे, तेवढीच खरी आहे का?
हॅण्ड जेल हानिकारक आहेत?
अभ्यासानुसार, हॅण्ड जेल तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. यात ट्रायकोल्सन असतं, ज्यामुळे हॉर्मोनमध्ये बदल होतात. इतकंच नाही तर यामुळे जीवाणू प्रतिकारशक्ती कमी होते.