कॅन्सर एक असा असाध्य आजार ज्याचे नाव एकूणच अंगाची थरकाप होते. पण विचार करून बघा जे ह्या असाध्य आणि बरे न होणारे जीवघेणे आजारांशी झुंज घेतात. त्यांची मन:स्थिती कशी होत असेल. या काळात त्यांना या आजारासाठी औषधोपचाराची गरज तर असतेच त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्यांच्या मानसिक आधाराची गरज असते. कॅन्सर या आजारामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी होत जाते. कॅन्सरचे विषाणू लवकर प्रसरण पावतात. झपाट्याने ह्यांची वाढ होते.
कॅन्सर शरीरात कोठे ही होऊ शकते. आज आपण ब्रेन च्या कॅन्सर बद्दल जाणून घेऊ या...
कॅन्सरचं असं रूप जे मेंदूत वाढतं. हा मेंदूचा आजार आहे. ह्या आजारात मेंदूत कॅन्सरचे घटक विषाणू मेंदूतील ऊतकांमध्ये वाढतात. यामुळे ऊतकांत गाठी बनतात ज्यांचे रूपांतर नंतर कॅन्सर मध्ये होतं. यामुळे मेंदूतील आजार वाढतात, मेंदूच्या सर्व क्रिया थांबतात. स्नायूंच्या हालचाली कमी होणे सुरू होते, मुंग्या येतात, स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. ब्रेन कॅन्सरच्या गाठी मेंदूवर प्रभाव टाकतात. त्यामुळे मेंदू व्यवस्थित काम करत नाही, त्याचा परिणाम शरीरांवर होऊ लागतो.