शर्करायुक्त पेये देऊ शकतात मानसिक विकार

लठ्ठ लोकांना डॉक्टर बर्‍याचदा गोडपदार्थांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. कारण त्यात मोठय़ा प्रमाणावर असलेल्या कॅलरींमुळे नाना व्याधीविकार डोके वर काढतात. मात्र हे शर्करायुक्त पदार्थ फक्त शारीरिक व्याधीच देत नाही तर मानसिक समस्यांनाही आमंत्रण देतात. हल्लीच वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका ताज्या अध्ययनातून हा खुलासा झाला आहे.

जे लोक जास्त प्रमाणात शर्करायुक्त पदार्थांचे सेवन करतात, त्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता अन्य लोकांच्या तुलनेत कितीतरी जास्त असते. पाच हजार तरुण-तरुणींना या अध्ययनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यात ते दिवसातून किती शर्करायुक्त पेयांचे सेवन करतात, असा सवाल करण्यात आला. त्यांच्यापैकी बहुतेकजण आठवड्यातून सहा वा त्यातून जास्त ग्लास गोडपेये घेणारे होते. अध्ययनकर्त्यांनी त्यांच्या मानसिक अवस्थेबाबत जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली दिली. त्यात ज्या मुलामुलींमध्ये आहार-व्यवहारासंबंधी जास्त विकार होते, त्यांचा बौद्धिक स्तरही कमी असल्याचे दिसून आले. जे लोक नेहमीच न्याहारीऐवजी शर्करायुक्त पेयांचे सेवन करतात, त्यांची चंचचला उच्च पातळीवर दिसून आली. त्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा अन्य गोष्टींकडेच जास्त असल्याचे दिसून आले. एवढेच नाही, त्यांच्यातील बहुतांश मुेल नैराश्यग्रस्तही आढळून आले.

वेबदुनिया वर वाचा