तांब्याचा वापर करुन जंतुसंसर्गाला ठेवा दूर

वाढते प्रदूषण कायमच चिंतेचा विषय ठरते आहे. धूळ व मातीमुळे होणारे प्रदूषण आजार पसरविणार्‍या जंतुसंसर्गाला कारणीभूत ठरते. घरात ज्याप्रकारे स्वच्छता पाळली जाते. 
 
त्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे कठीण असते. परंतु, तांब्याचा वापराने हे सहज शक्य होते. धूळ व मातीसारख्या उघडय़ावरच्या वस्तूंना स्पर्श केल्यास जंतुसंसर्ग होतो हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. दवाखाने, सिनेमागृह, सरकारी कार्यालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी हा धोका जास्त असतो. एखादय़ा आजारी व्यक्तीने स्पर्श केलेल्या जागी जर निरोगी व्यक्तीने पुन्हा स्पर्श केला तर त्याला जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. यातच, स्टेपिलोकॉसस ऑरियस नावाचा बॅक्टेरियाचा प्रसार जलद गतीने होतो. कारण, मेटल किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांडय़ांवर जंतू दीर्घकाळ टिकतात व त्यांचा प्रसारही झपाटय़ाने होतो. मात्र तांब्याच्या भांडय़ावर हे जंतू फार काळ टिकत नाहीत व त्यांचा त्वरित नाश होतो. 
 
साऊथ अँप्मटन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे शोधून काढले आहे. जंतू जेव्हा तांब्यावर पडतात तेव्हा त्यांची प्रजनन क्षमता संपुष्टात येते. परिणामी ते त्वरित नाश पावतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी तांब्याचा जास्तीत-जास्त वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. उदा: दरवाजाचे हॅण्डल, सिंक यांना वारंवार हाताचा स्पर्श होतो. त्या ठिकाणी तांब्याचा वापर केला जाऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा