झोप नसेल येत तर घरात ठेवा ही झाडे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे झोप न येण्याची तक्रार अगदी सामान्य झाली आहे, पण यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम पाहायला मिळतं आहे. अनेक लोकं या रोगावर लाखो रुपये खर्च करून देतात तरी हवे तसे परिणाम हाती लागत नाही. जर आपणही अश्या लोकांपैकी एक आहात तरी हे लेख आपल्यासाठीच आहे असे समजा.
 
अनेक लोकांना हे माहीत नसेल की आपल्या कमर्‍यात येणार्‍या वायूची गुणवत्ता, आपल्या झोपेला खूप प्रभावित करते. वायूमध्ये असणारे कण आपल्या झोपेत व्यवधान उत्पन्न करू शकतात. यासाठी घरात येणारी वायू शुद्ध असायला हवी. घरात काही झाडी लावून या तक्रारीपासून मुक्ती मिळू शकते. 
 

1. परवल वेल- भाजीसाठी उपयोगात येणारी परवल वेल वायू शुद्ध करण्याचे काम करते. शोधाप्रमाणे ही वेल 94 टक्के पर्यंत वायूला शुद्ध करते. दमा आणि श्वसनसंबंधी तक्रारी हे बेल लावण्याने कमी होते.


2. एलोव्हेरा- एलोव्हेराचं झाड केवळ झोपेसाठीच नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी घरात लावलं पाहिजे. एलोव्हेरा रात्री ऑक्सिजन सोडतं करतं ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर बघायला मिळतो. हे झाड अनिद्रापासून वाचवतं.


3. जाई- हे आकर्षक आणि सुगंधी झाड घरात लावल्याचे अनेक फायदे आहेत. याने ताण कमी होतो आणि अस्वस्थता दूर होते. याने मानसिक स्थिती चांगली राहते. चांगल्या झोपेसाठी हे फायदेशीर असून झोप झाल्यावर ताजेतवाने वाटतं.


4. लव्हेण्डर- हे झाड आपले मूड सकारात्मक ठेवण्यात मदत करतं. याव्यतिरिक्त हे ताण आणि अस्वस्थता दूर करतं. रात्री झोपण्याआधी किंवा झोपेत रडणार्‍या मुलांसाठी हे खूप फायदेशीर आहेत.


5. स्नॅक प्लांट- घराच्या सजावटीसाठी प्रयोग करण्यात येणारं हे झाडं चांगल्या झोपेसाठीही फायदेशीर आहेत. याने वायू शुद्ध होते आणि उत्तम वातावरण निर्मित होतं. एका संशोधनाप्रमाणे हे झाड, डोळ्यात होणारी तक्रार, श्वसनसंबंधी तक्रार आणि डोकेदुखी कमी करण्यात मदत करतं. हे झाड सक्रिय राहण्यासाठी साहाय्य करतं.

वेबदुनिया वर वाचा