चार टमाटे संपविणार किडनी कॅन्सरचा धोका

मंगळवार, 10 जून 2014 (12:56 IST)
टमाटे चांगले वाटत नाही? परंतु आता तुमच्याकडे याला पसंत करण्याचे कारण आहे. टमाट्याने भरपूर आहार खूप फायदेमंद आहे आणि विशेषत: महिलांमध्ये किडनीशी संबंधित कॅन्सरचा धोका कमी करतो.

एका अध्ययनात हे सांगण्यात आले की, टमाटे किंवा लाइकोपिनने भरपूर भाजीपाला किंवा फळे किडनीशी संबंधित कॅन्सरचा धोका कमी करू शकतात.

ओहियोचे केस वेस्टर्न रिझव्र्ह विद्यापीठाचे मेडिकल रेजिडेंट वोन जिन हो यांच्या लाईव सार्इंस रिपोर्टनुसार अध्ययनात हे समोर आले की, तसे तर महिला ज्यांच्या खुराकमध्ये जास्तीत जास्त लाईकोपिन असते त्यांचे लाईकोपिन स्तर त्याच्याबरोबर आहे जे दररोज चार टमाटे खातात. लाईकोपिन एक एंटीअ‍ॅक्सिडेंट आहे जे टमाटे, टरबूज, मौसंबी व पपईमध्ये आढळते. यामुळे या फळांचा रंग फिकट लाल होतो. हे अध्ययन रजोनिवृत्त झालेले अंदाजे ९२ हजार महिलांवर करण्यात आले. अध्ययनात ३८३ महिलांमध्ये किडनी कॅन्सरचे लक्षण दिसले.

अध्ययनात हे स्पष्ट झाले की, लाईकोपिन किडनी कॅन्सर कमी करण्यात सहायक सिद्ध झाले. अध्ययनानुसार, ज्या महिलांनी लाईकोपिनचे सेवन जास्तीत जास्त केले. त्यात किडनी कॅन्सरचा धोका कमी लाईकोपिन सेवन करणा-या महिलांच्या तुलनेत ४५ टक्क्यापर्यंत कमी झाले. अध्ययनाचा निष्कर्ष शिकागोमध्ये अमेरिकन सोसाईटी फॉर क्लीनिकल आन्कोलॉजीच्या बैठकीत प्रस्तुत करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा