चांगल्या झोपेसाठी टिप्स

धकाधकीची जीवनशैलीमुळे झोप न येणे फार मोठी समस्या झाली आहे. कामाचा व्याप वाढत असल्याने शहरातील लोकांची झोप उडाली आहे. शहरी जीवनशैली जगणारे कित्येक तरुणांना याची तक्रार आहे. तज्ज्ञांप्रमाणे या धावत्या जीवनशैलीतही तुम्ही चांगली आणि शांत झोप घेऊ शकता. पण त्याआधी आपल्या झोपण्याचे ठिकाण आरामदायक आहे याची खात्री पटवून घ्यायला हवी.
 
* अवेळी झोपणे
झोपण्याची संधी मिळ्याल्यावर भरपूर झोप काढून घेण्याने रूटीन गडबडतो आणि ही सवय इतर रोगांनाही आमंत्रण देते.
 
* चहा- कॉफी, एनर्जी ड्रिंक टाळावे
काही लोकं झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंकचे सेवन करतात. त्याऐवजी गरम दूध पिणे जास्त फायदेशीर राहील. दुपारनंतर एनर्जी ड्रिंकचे सेवन करू नये. तसेच संध्याकाळी चार वाजे नंतर एका कपापेक्षा जास्त चहाचे सेवन करू नये.
 
* जेवण्यानंतर लगेच झोपू नये
कधीही जेवणं झाल्याबरोबर लगेचच झोपायला जाऊ नये. जेवण्याच्या किमान 2 ते 3 तासानंतरच झोपणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. चांगल्या झोपेसाठी डिनरमध्ये लाइट जेवण घ्यावं. डचाडच पोटभरेपर्यंत आहार घेण्यानेदेखील झोप मोड होते. रात्रीच्या जेवण्यात शक्योतर सूप, सलाडचे जास्त प्रमाणात सेवन करायला हवा.
 
* घ्या कधी थोडीशी
दिवसभराच्या तणावामुळे मानसिक शांती नसेल मिळतं तर कमी प्रमाणात अल्कोहल घेण्यात हरकत नाही. याने तणाव कमी होऊन शांत झोप लागेल.
 
* झोपण्याआधी अंघोळ नको
काही लोकं झोपण्याआधी अंघोळ करतात. हे झोप न येण्याचे मुख्य कारण ठरू शकतं.
 
* झोपण्यापूर्वी योग किंवा मेडिटेशन
झोपण्यापूर्वी योग करणे किंवा लाइट एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरू शकतं. या दरम्यान तुम्ही मानसिक शांतीकरिता मेडिटेशनही करू शकता.
 
* रूममध्ये मंद प्रकाश
प्रत्येकाला झोपताना आपआपल्या हिशोबाने प्रकाशाची सवय असते. तरीही चांगली झोप हवी असेल तर रूममध्ये पिवळा मंद प्रकाश असणे योग्य आहे. जर तुम्हाला पुस्तक वाचता-वाचता झोपण्याची सवय असेल तर टेबल लॅम्पमध्ये जास्त प्रकाश देणारा लाइट लावू नये.
 
* मोबाइल आणि टीव्ही टाळावे
शक्योतर झोपण्यापूर्वी टीव्ही पाहणे किंवा मोबाइलवर बिझी असणे टाळावे. बर्‍याचवेळा मोबाइल आणि टीव्हीमुळे आपलं चित्त विचलित होतं आणि झोप उडून जाते.
 
* बेडरूमचे दार लावावे
झोपण्यापूर्वी आपल्या बेडरूमचे दार लावून घ्यावे. याने मन शांत होतं आणि तुम्ही निश्चिंत होऊन झोपू शकता.
 
* दिवस गेला निघून, त्याचा नका करू विचार
काही लोकं बेडवर गेल्यानंतर दिवसभर घडलेल्या गोष्टींवर विचार करत राहतात. हे अगदी चुकीचे आहे. यामुळे तुम्ही अधिक प्रश्नांमध्ये गुंतत जातात. हे विचार टाळण्याचे प्रयत्न करावे. नवीन पहाट पाहण्यासाठी मनाला शांत ठेवण्याचे प्रयत्न करावे.

वेबदुनिया वर वाचा