चहाने मलेरियावर होणार प्रभावी उपचार

शुक्रवार, 15 मे 2015 (13:05 IST)
न्यूयॉर्क। मलेरिया हा एक जगभरात आढळून येणारा गंभीर आजार आहे. यावर वेळीच उपचार केले नाही तर प्रसंगी रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मलेरियावरील उपचारासाठी संशोधकांनी असा एक चहा तयार केला आहे की, त्याने या रोगावर उपचार करणे शक्य होणार आहे.
 
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी असा एक चहा तयार केला आहे की, त्यामुळे मलेरियावरील उपचार प्रभावी ठरू शकेल. या हर्बल चहाच्या पानात मलेरियाविरोधी घटक आहेत. लवकरच हा चहा अँटिमलेरियल फाईटोमेडिसीन नावाने बाजारात येणार आहे. संशोधक जेफिरिन डाकूयो यांनी सांगितले की, हा हर्बल चहा कोक्लोस्पेरमम प्लैकोंजी, फायलांथस अॅमारस आणि कॅसिया अलांटा नामक औषधांच्या मिश्रणाने तयार करण्यात आले आहे. तूर्तास हे संशोधक या चहाची व्यापक शेती करण्याच्या पर्यायावर अभ्यास करत आहेत.

या चहामुळे केवळ मलेरियावरच नव्हे तर हेपेटायसीसवरही उपचार करणे शक्य आहे का? यावरही संशोधक अभ्यास करत आहेत. हे संशोधन 'द जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्पिलिमेंटरी मेडिसीन'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा