रोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा

सोमवार, 6 जुलै 2015 (11:07 IST)
हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका 21 टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय. पोतरुगालच्या फॅकल्डेड डी मेडिसीन डी युनीवर्सिडेड डी लिस्बोआचे प्राध्यापक डॉ. अँटेनिओ वाज कारनीरो यांनी हा खुलासा केलाय. अशा गोष्टींची माहिती आपणास असणे आवश्यक आहे ज्याने आपल्याला मृत्यूचा धोका कमी होतो. थोडय़ा प्रमाणात कॉफी पिऊन आपल्या आरोग्याची काळजी घेता येते. तसेच यामुळे संपूर्ण युरोपात आरोग्यावर होणार्‍या खर्चावरही नियंत्रण मिळवता येते, असं कारनीरो यांचं म्हणणं आहे.
 
‘इन्स्टिटय़ूट फॉर सायन्टिफिक इन्फॉर्मेशन ऑन कॉफी’ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, जीवनशैलीत बदल आणून मृत्यूचा धोका कमी करता येतो. या अभ्यासात दिवसातून 3 वेळा कॉफी प्यायल्याने 21 टक्के धोका कमी होतो. 3 ते 5 वेळा कॉफी घेतल्याने टाईप-2 मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असं म्हटलं गेलंय. तसंच मधुमेहींना हृदयरोगाचा सर्वाधिक धोका असतो, असंही यात नमूद करण्यात आलंय. जीवनशैलीत बदल आणून महिला 50 टक्क्यापर्यंत हृदयरोगाचा धोका कमी करू शकतात. 

वेबदुनिया वर वाचा